E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
वाचक लिहितात
Wrutuja pandharpure
26 Apr 2025
हल्ल्याचे राजकीय भांडवल नको
पहलगाम घडवणार्यांना अद्दल घडविली जाईल, अशी गर्जना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मधुबनी येथील जनसभेत दि.२४ एप्रिल रोजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तर प्रदेशातील कानपूर येथे दौरा होता. तो रद्द करून मोदी बिहारमधील मधुबनी येथे पोहोचले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२७ मध्ये आहेत, तर बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर आहेत. म्हणूनच मोदींनी बिहार दौर्यास प्राधान्यक्रम दिला का? पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचे अंत्यसंस्कार होण्याच्या आत मोदी बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मश्गूल दिसले; यास काय म्हणावे? जनसभेत देखील त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. यावरून भाजप बिहार विधानसभा निवडणुकीत देखील या दहशतवादी हल्ल्याचे भांडवल करणार का? असा प्रश्न उपस्थित होतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला फाटा देत मोदी बिहारला गेले हे अधिकच खटकणारे आहे.
बाळकृष्ण शिंदे, पुणे
काश्मिरी घोडेवाल्यास सलाम
काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेनंतर यापुढे काश्मीरमध्ये कोणीही पर्यटक जाण्याचा विचार करणार नाही. पर्यायाने काश्मीरमध्ये पर्यटकांवर उदरनिर्वाह करणार्या स्थानिक काश्मिरी मुस्लिम जनतेवर उपासमारीची पाळी येणार आहे. आतापर्यंत पाक पुरस्कृत दहशतवादी स्थानिक मुस्लिमांवर हल्ले करत नव्हते; पण पर्यटकांना घोड्यावरून फिरविणारा मुस्लिम आदिल शाहला पर्यटकांचा जीव वाचण्यासाठी दहशतवाद्यांची बंदूक हिसकावून घेताना जीव गमवावा लागला. हे त्या घोडे मालकाचे कृत्य धाडसी होते. त्याने हिंदू पर्यटकांसाठी दिलेल्या बलिदानास सलाम.
माधव ताटके, पुणे
भारताने ठाम भूमिका घ्यावी
२००९ आणि २०१६ मधील काश्मीर आठवला, की अंगावर शहारा येतो. त्याच काश्मीरमध्ये आता वातावरण पूर्णतः बदलले आहे. ना दगडफेक, ना भारतविरोधी घोषणा. नागरिक आता सैन्याला आदराने पाहतात आणि सर्वसामान्य काश्मिरी माणूसही दहशतवादाला थारा देत नाही. सदर हल्ला याच बदलाच्या विरोधात केला गेला असे लक्षात येते. पर्यटकांवर हल्ला करून पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण करणे, रोजगार संपवणे आणि बेरोजगार तरुणांना दहशतवादाच्या मार्गावर ढकलणे हा यामागचा निघृण हेतु आहे. या वर्षी काश्मीरमध्ये तब्बल तीन कोटी पर्यटक येण्याची नोंद झाली आहे. पर्यटन हे आता काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनत आहे आणि हीच बाब दहशतवाद्यांना अस्वस्थ करत आहे. या हल्ल्यात ज्यांनी प्राण गमावले, त्यांना श्रद्धांजली शब्दांत नव्हे, तर कृतीतून व्यक्त व्हावी, अशी आता गरज आहे. इस्रायलने हमासच्या हल्ल्यानंतर जसा निर्णायक कारवाईचा मार्ग घेतला, तशीच ठाम भूमिका भारतानेही घ्यावी, हीच देशवासियांची भावना आहे.
अपर्णा जगताप, पुणे
मदतीत राजकारण नको
पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २८ निरपराध लोकांचा मृत्यू झाला. ही घटना काळीज हेलावणारी आहे. वास्तविक काश्मीरमध्ये असलेल्या नागरिकांना, परत आणण्यासाठी विशेष विमान सेवा व रेल्वेची सोय करण्यात येत आहे; परंतु त्यावरून तिन्ही पक्षातील नेत्यांची चढाओढ सुरू आहे, ही बाब दुर्दैवी आहे. यात समन्वय रहावा म्हणून फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना काश्मीरमध्ये पाठवले आहे. अशा नाजूक प्रसंगी तरी ही जबाबदारी इतर घटकपक्षातील लोकनेत्यांवर सोपवणे अपेक्षित असते.
गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई
हल्ल्यांना जशास तसे उत्तर द्या
काश्मीरमधील पहलगाम येथील उंचावर डोंगराळ भाग निसरड्या, निमुळत्या रस्त्यांनी घेरलेला असतो, तिथे दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षेसाठी नेमलेल्या जवान किंवा पोलिसांच्या अभावाचा गैरफायदा घेतला आणि पर्यटकांवर अंदाधुंद, बेफाम गोळीबार करण्यापूर्वी त्या भागात पोहोचलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला. पोलिसांसारखा गणवेश परिधान केलेल्या दहशतवाद्यांनी हिंदू धर्माचे नाव सांगताच निष्पाप पर्यटकांची गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केले गेले. सत्तेवर आलेल्या सरकारला संरक्षणासंबंधी अनेक कामे पूर्ण करणे बाकी होती, त्यात विशेषकरून पर्यटनस्थळांवर आपत्कालीन परिस्थितीत पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नव्हती. अशावेळी गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीचे विश्लेषण न करताच येणार्या पर्यटकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्याचे गांभीर्य बाळगले नाही. कठोर सुरक्षा व्यवस्थेच्या धाकाच्या अभावाने दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ले करून आपले हातपाय पसरण्यास सुरुवात करीत असल्याचे संकेत मिळत आहेत. या हल्ल्यामागे दहशतवाद्यांच्या टोळ्या कार्यरत असून पर्यटन व्यवसायाला बाधा घालणे, सीमेपलीकडून ड्रग्स आणि शस्त्रांस्त्रांच्या तस्करी व्यापार सुरू ठेवणे, हिंदू, मुस्लीम समाजामध्ये तेढ निर्माण करणे अशी अनेक कारणे असू शकतात; मात्र पाकिस्तान पुरस्कृत अशा कारवायांना त्याच प्रकारांनी त्यांचे तंत्र त्यांच्यावर उलटवून टाकण्याचे प्रयत्न सुरू केले जावेत.
स्नेहा राज, गोरेगांव.
काश्मीरच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम
पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला देशाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढणारा आहे. भारताचे नंदनवन समजल्या जाणार्या काश्मीरमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात पर्यटक येथील सौंदर्य आणि गारवा अनुभवण्यासाठी येत असतात.यातून राज्यासह देशाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष करून काश्मीरविषयी भय निर्माण केले आहे. यातून भविष्यात काश्मीरमध्ये येणार्या पर्यटकांची संख्या नक्कीच रोडावणार आहे ज्याच्या परिणाम देशाच्या महसूलावर होणार आहे. काश्मीरमधून ३७० कलम काढल्यानंतर काही काळातच तेथील परिस्थिती भयमुक्त केल्याच्या वल्गना केंद्र सरकारकडून केल्या जात होत्या; मात्र या हल्याने त्या सपशेल फोल ठरवल्या. आतंकवादाला धर्म नसतो हे लहानपणापासून आम्हाला शिकवले गेले, मात्र काश्मीरमध्ये झालेल्या हल्यात आतंकवाद्यांनी पर्यटकांना त्यांचे धर्म विचारून केवळ हिंदूंना लक्ष्य केले हेही आता स्पष्ट झाले आहे. देशात दहशतवादी हल्याच्या धमक्या केवळ हिंदूंच्या सण उत्सवांना आणि कुंभपर्वांना येतात. आजतागायत भारतात जे काही दहशतवादी हल्ले झाले ते करणारेही बहुतांश एकाच पंथांचे होते एव्हढे सर्व घडूनही आपण आजही हेच म्हणायचे का की दहशतवादाला धर्म नसतो? देशाच्या स्वातंत्र्यानंतर दहशतवादी हल्याचा जो अनुभव भारतीयांनी घेतला आहे तो अनुभव खचितच कोणत्या देशाने घेतला असेल. दहशतवाद्यांनी आजतागायत देशभरात हजारो निरपराध नागरिकांची हत्या केली आहे. स्त्रिया आणि बालकांनाही त्यांनी सोडलेले नाही. हजारोंचे संसार उध्वस्त केले आहेत. देशाच्या संपत्तीची अपरिमित हानी केली आहे. पहलगाम हल्यानंतरही समस्त राजकीय मंडळींनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केले आहेत. विरोधी पक्षांनी सत्तास्थानी असलेल्या भाजपला लक्ष केले आहे. माननीय पंतप्रधानांनीही दहशतवाद्यांना सोडणार नसल्याचे विधान केले आहे. देशाचे गृहमंत्री हल्ल्यानंतर तात्काळ श्रीनगरमध्ये दाखल झाले. हल्ल्यानंतर तीव्र निषेध करणे, मेणबत्या पेटवणे, मोर्चे काढणे, सोशल मीडियावर चिड व्यक्त करणे आता पुरे झाले. भारतीयांना या हल्याचा बदला हवा आहे तोही इस्त्रायल सारखा. इस्त्रायलवर ज्या दहशतवादी तळावरून हल्ला होतो तो तळच इस्त्रायल उध्वस्त करते. ज्यू नागरिक जगाच्या पाठीवर कुठेही रहात असला तरी तो स्वतःला सुरक्षित समजतो कारण त्याच्या पाठीशी त्याचा देश उभा असतो. चोहोबाजूनी बलाढ्य शत्रूराष्ट्रानी वेढला असूनही इस्त्रायलने या देशांवर आपला दरारा कायम ठेवला आले. त्या तुलनेत भारत बलशाली असतानाही भारतात अधूनमधून कुठेना कुठे हल्ले होतच असतात. भारतानेही आता इस्त्रायलप्रमाणे बाणेदारपणा अंगीकारला पाहिजे. . देशात राहून शत्रूराष्ट्राशी इमान राखणार्या, आतंकवाद्यांना आश्रय देणार्या स्थानिक देशद्रोह्यांनाही जन्माची अद्दल घडवायला हवी.
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई
Related
Articles
पहलगामनंतरचे बहुतांश सायबर हल्ले निष्फळ
14 May 2025
राज्याचा ९४. १० टक्के निकाल; निकालात घट
13 May 2025
किरकोळ महागाई वाढीचा दर कमी
14 May 2025
फिलीपिन्समध्ये ज्वालामुखीचा उद्रेक
14 May 2025
पाकिस्तानशी चर्चा केवळ दहशतवाद आणि व्याप्त काश्मीरवरच : मोदी
13 May 2025
हुतात्मा जवानाचे पार्थिव पाहून कुटुंबीयांना दुःख अनावर
13 May 2025
पहलगामनंतरचे बहुतांश सायबर हल्ले निष्फळ
14 May 2025
राज्याचा ९४. १० टक्के निकाल; निकालात घट
13 May 2025
किरकोळ महागाई वाढीचा दर कमी
14 May 2025
फिलीपिन्समध्ये ज्वालामुखीचा उद्रेक
14 May 2025
पाकिस्तानशी चर्चा केवळ दहशतवाद आणि व्याप्त काश्मीरवरच : मोदी
13 May 2025
हुतात्मा जवानाचे पार्थिव पाहून कुटुंबीयांना दुःख अनावर
13 May 2025
पहलगामनंतरचे बहुतांश सायबर हल्ले निष्फळ
14 May 2025
राज्याचा ९४. १० टक्के निकाल; निकालात घट
13 May 2025
किरकोळ महागाई वाढीचा दर कमी
14 May 2025
फिलीपिन्समध्ये ज्वालामुखीचा उद्रेक
14 May 2025
पाकिस्तानशी चर्चा केवळ दहशतवाद आणि व्याप्त काश्मीरवरच : मोदी
13 May 2025
हुतात्मा जवानाचे पार्थिव पाहून कुटुंबीयांना दुःख अनावर
13 May 2025
पहलगामनंतरचे बहुतांश सायबर हल्ले निष्फळ
14 May 2025
राज्याचा ९४. १० टक्के निकाल; निकालात घट
13 May 2025
किरकोळ महागाई वाढीचा दर कमी
14 May 2025
फिलीपिन्समध्ये ज्वालामुखीचा उद्रेक
14 May 2025
पाकिस्तानशी चर्चा केवळ दहशतवाद आणि व्याप्त काश्मीरवरच : मोदी
13 May 2025
हुतात्मा जवानाचे पार्थिव पाहून कुटुंबीयांना दुःख अनावर
13 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
संघर्ष ‘सध्या’ थांबला (अग्रलेख)
2
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
3
मानकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
4
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच
5
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
6
१०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा; ४० पाकिस्तानी सैनिकही ठार